अमरावती: अज्ञात युवकाच्या खुनाचा ८ तासात उलगडा,शहर गुन्हे शाखेची कारवाई,आरोपी विश्वांबर दिगांबर मांजरे,यास बुलडाणा जिल्हयातून अटक
१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८.०० वाजता. चे सुमारास . बडनेरा पोलिस स्टेशन हद्दीतील हनुमान गढी ते भानखेडा रोडवरील जंगलात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. सदर मृतदेहाच्या डोक्यावर दगड टाकून अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचा खून केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत होते.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण व त्यांचे पथकाने घटनास्थळास भेट देवून पाहणी केली व मृतदेहाच्या बाजूस असलेल्या मोटरसायकल वरून तपासास सुरुवात केली. सदरची पेंशन प्रो मो.सा. क. एम.एच.२७ ए. झेड. १८७५ ही टवलार.....