मोर्शी: रोजगार हमी योजनेतील वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरावर, उपासमारीची पाळी आष्टगाव साईट वरील मजुरांची प्रतिक्रिया
रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरांना गेल्या पाच महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली असून, आज दिनांक सहा नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता आष्टगाव येथील मजुरांनी प्रत्यक्ष साइटवरून आपली प्रतिक्रिया देऊन, मजुरांचे रखडलेले वेतन तातडीने देण्याची मागणी केली आहे. येत्या आठवड्यात मजुरांना वेतन न मिळाल्यास,काम बंद करण्याचा इशारा देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरांनी दिला आहे