चुंचाळे शिवार अंबड येथून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दिनांक 3 डिसेंबर रोजी घडली असून पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा डिसेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची सोळा वर्षे अल्पवयीन मुलगी ही पाणीपुरी खायला जाते असे सांगून फिर्यादी यांचा मुलासोबत चुंचाळे शिवार येथे गेले, परंतु मुलाचे लक्ष नसताना अज्ञात तरुणाने तिला काहीतरी आमिष दाखवून पळून नेले.