अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक - ६ विलास नगर अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास योजनेच्या ४८ लक्ष निधी अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक महाकारुणिक बौद्ध विहार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे पार पडला. सदर भागातील सभागृहावरील मोकळ्या जागेवर वाचनालयाचे बांधकाम करणे,श्री. खंडारे ते श्री. वानखडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व नाली बांधणे, इत्यादी कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.