पालघर: आचोळे येथे भारतीय जनता पक्षात परिसरातील महिलांनी केला प्रवेश
भारतीय जनता पक्षात आचोळे परिसरातील महिलांनी प्रवेश केला आहे. भाजपची सदस्यता ग्रहण करत भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आचोळे येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात हा पक्षप्रवेश संपन्न झाला. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.