सिन्नर: देवपूर १० ते ११ महिन्यांच्या बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले
Sinnar, Nashik | Nov 27, 2025 देवपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्या आणि तिचे दोन बछडे यांच्या मुक्त संचाराने गावात दहशतीचे सावट पसरले होते. चार दिवसांपूर्वी एकाच दिवशी मादी बिबट्या व तिच्या एक बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र, दुसरा बछडा अजूनही परिसरात फिरत असल्याने वनविभागाकडून पुन्हा परिसरात पिंजरा लावला होता