धुळे तालुक्यातील चांदे शिवारातील बनावट नोट प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत मलकापूर येथील धान्य व्यापाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३४ बनावट नोटा जप्त झाल्या. पहिल्या आरोपीच्या चौकशीत त्याचे नाव समोर आले होते. आतापर्यंत दोन जणांना अटक व ३९ हजारांच्या बनावट नोटा जप्त झाल्या असून, मालेगाव घटनेशी संबंध आहेत का याचा तपास सुरू आहे, अशी माहिती निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.