शिरूर: महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत चोरटे अटकेत
Shirur, Pune | Nov 7, 2025 5 नोव्हेंबर पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असुन स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या टोळीतील तीन आरोपींना अटक करत तब्बल सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.