अमरावती: कंटेनर मधुन गोवंश तस्करी करणा-या आरोपीतांवर अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
आज ११ नोव्हेंबर मंगळवार रोजी अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्याचे पथकासह लोणी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली की, कारंजा लाड ते अमरावती रोडवर कंटेनर मध्ये गोवंश जातीचे जनावरे यांचे पाय व तोंड बांधून क्रुरतेने वागणुक देवून गाडीमध्ये कोंबुन कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरुन अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाने लोणी रोडवरील मातोश्री ढाबा येथे नाकाबंदी करुन सदर कंटेनर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता...