मेहकर: नागपूरच्या अभ्यासकांनी पर्यटन विकास अभ्यास दौऱ्यादरम्यान आ. खरात यांची घेतली भेट, आमदारांनी केली मार्गदर्शन
उत्कर्ष फाऊंडेशन सिंदखेडराजा व युवक बिरादरी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील सत्यसाई विद्यामंदिर आणि स्व दौलतराव ढवळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथील २५ शिक्षकांचा पर्यटन विकास अभ्यास दौरा मेहकर येथे आला होता. सदर अभ्यासकांनी मेहकर लोणार मतदारसंघाचे आ. सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन आ. सिद्धार्थ खरात यांचे स्वागत केले व आ. सिद्धार्थ खरात यांनी सुद्धा सर्व अभ्यासकांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. व दौऱ्याची यशस्वी आयोजन केले.