चिखली: चिखलीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखली शिवसेनेच्या वतीने रेणुका मातेला पातळ अर्पण
आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, चिखली शहराचे ग्रामदैवत श्री रेणुका मातेला आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पातळ अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. शिवसेना चिखली शहर शाखेच्यावतीने आयोजित हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाने पार पडला.आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा जपत, आमदार गायकवाड यांनी रेणुका मातेकडे जिल्ह्यातील शिवसेनेच्या बळकटीसाठी, संघटनेच्या एकजुटीसाठी प्रार्थना केली.