देशभरात इंडिगोची 550 हून अधिक उड्डाणे रद्द झाल्याने विमानतळांवर मोठी गर्दी उसळली आहे. सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या या गोंधळामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू यांसह प्रमुख विमानतळांवर प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक तास प्रतीक्षा करूनही फ्लाइट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये संताप वाढला आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबई आणि पुण्याचे सुमारे दोनशे प्रवासी कालपासून इंडोनेशियामध्ये अडकले असून त्यांच्या परतीचा मार्ग अद्याप मोकळा झालेला