लातूर: लातूरच्या एल.आय.सी कॉलनीत तहसीलदार- तलाठ्यांचे दुर्लक्ष, नागरिकांना मदतीच्या अपेक्षेविना ठेवले वंचित
Latur, Latur | Nov 29, 2025 लातूर -२०२५ च्या जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे लातूर शहरातील कन्हेरी भागातील एल.आय.सी कॉलनी प्रभाग क्र. १७ मध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तू आणि धान्याचा मोठा नाश झाला आहे. तलाठी यांनी पंचनामा करून पाहणी केली तरीही नुकसानभरपाई मिळाली नाही.उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंड अधिकारी यांना नुकसानविषयक निवेदन दिले असून, संतोष ठाकूर (रमाई आवास योजना प्रमुख), हिरालाल कांबळे (स्वच्छता निरीक्षक), आणि संतोष पाटील (ग्राम महसूल) यांनी पंचनामा रितसर केला.