अर्जुनी मोरगाव: आदर्शनगर/मुंगली तसेच तावसी/खुर्द येथे लावणी च्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
आदर्शनगर/मुंगली तसेच तावसी/खुर्द येथे मंडईच्या पार्श्वभूमीवर आयोजित लावणी च्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. या सांस्कृतिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कलागुणांना व्यासपीठ मिळून सामाजिक जाणीवा दृढ होतात. मंडईच्या निमित्ताने भरविण्यात येणारे लावणी हा केवळ करमणुकीचा नव्हे तर समाजाभिमुख संदेश देणारा प्रभावी मंच आहे. असे याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले.