उदगीर: शिवसेनेच्या पाठीमागे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, माजी आमदार सुधाकर भालेराव
Udgir, Latur | Nov 26, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूक ही महायुती म्हणून लढविली जाईल याकडे उदगीर वासीयांचे लक्ष लागले होते,परंतु शिंदे शिवेनेला भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बगल देत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केल्याने,शिंदें शिवसेनेला वेगळी चूल मांडावी लागली,शिवसेनेने नगरपालिका निवडणुकीत २६ उमेदवार उतरवले असून निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे, शिंदे शिवेनेच्या पाठीमागे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद असून,आम्ही निवडणूक नक्की जिंकू असा विश्वास माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केला