चंद्रपूर: भाजपाचा आमदार किशोर जोरगेवार यांची चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदी निवड
महानगरपालिका निवडणुकीसाठी जेमतेम काही महिने शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.