कुही: अतिक्रमण धारकाची मालची शिवारात सारपंचास जीवे मारण्याची धमकी
Kuhi, Nagpur | Nov 24, 2025 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या मालची शिवारात अतिक्रमण धारकाने सरपंच यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने अतिक्रमण धारकाची कूही पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.अतिक्रमण धारकाने जेसीबी मशीन च्या सहाय्याने कोणतीही परवानगी न घेता झाडे उपडून फेकली आणि पाणीपुरवठा पाईपलाईन फोडली. त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यावरून सरपंच व कर्मचारी घटनास्थळी गेले असता सरपंच यांना अतिक्रमण धारकाने जीवे मारण्याची धमकी दिली .