विक्रमगड: भारतीय जनता पक्षात विक्रमगड येथील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा खासदारांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
भारतीय जनता पक्षात विक्रमगड येथील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद गट दादडे अंतर्गत पंचायत समिती गण दादडे येथील डोल्हारी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य निलेश काचरा, सावरपाडा पेसा अध्यक्ष उमेश मलावकर व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपचे नेते बाबाजी काठोळे व पदाधिकारी उपस्थित होते.