शिरूर कासार: अनंत गरजे हा माझा पीए असला तरी तो एक कर्मचारी आहे, मंत्री पंकजा मुंडे यांनी पालवे कुटुंबीयांची भेट घेऊन दिला धीर
अनंत गर्जे हा माझा पीए असला तरी तो फक्त एक कर्मचारी आहे. त्याच्या खासगी आयुष्यात काय सुरू होते, याची मला कल्पना नाही. मला माहीत असते तर अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. परंतु मला प्रकाराविषयी काहीच माहीत नव्हती. माझ्या कर्मचाऱ्यांच्या घरात काय चालले हे मला कसं माहीत असणार आहे. ज्यावेळी मला प्रकार कळाला त्यावेळी मला धक्का बसला. तो माझा पीए असला किंवा माझा मुलगा असला तरी मी अशा गोष्टींना कधीही पाठीशी घातलं नाही आणि घालणार पण नाही.