औंढा नागनाथ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष औंढा नागनाथ तालुका प्रमुख पदी अनिल शिंदे यांची निवड,यजमान निवास येथे बैठक पडली पार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची औंढा नागनाथ येथील यजमान निवास येथे दिनांक 10 नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी तीन वाजता पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, उपजिल्हाप्रमुख जीडी मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या औंढा नागनाथ तालुकाप्रमुख पदी अनिल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार घालून व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती