सेलू: वडगांव (जंगली) येथे वादात मध्यस्थी करणाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Nov 27, 2025 शेती विक्रीच्या पैशावरून सुरू असलेल्या बापलेकाच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावास लहान भावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना वडगांव (जंगली) येथे घडली. या प्रकरणी सौ. पौर्णिमा रितेश शंभरकर (वय ३४, रा. वडगांव जंगली) यांनी ता. २७ गुरुवारला दुपारी २ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संदेश शंभरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.