गोंदिया: रुग्णवाहिकेच्या चालकाला केली मारहाण,मृतदेह घेऊन जाण्यासाठी बोलणी सुरू असताना झाल वाद
मृतदेह घेऊन जाण्यासाठी बोलणी सुरू असताना झालेल्या वादातून रुग्णवाहिकेच्या चालकाला मारहाण करण्यात आली. शहरातील के.टी.एस. दवाखाना परिसरात २९ नोव्हेंबर रोजी रात्री १०:४५ वाजता ही घटना घडली.रुग्णवाहिका चालक दीपक खरवडे (२४, रा. गोंदिया) हा के.टी.एस. दवाखान्यातील टिनशेडसमोर मृत रुग्णाच्या नातेवाइकांशी मृतदेह नेण्याबाबत बोलणी करीत होता. त्याचवेळी तिथे आलेल्या आरोपी मनीष बालाजी पडोळे (४५,रा. मरारटोली) याने ‘रुग्ण माझ्या ॲम्ब्युलन्सने घेऊन जा’ अ