हिंजवडी परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भुजबळ चौक आणि वाकड ब्रिज परिसरात लक्झरी बसने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर बसचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्परता दाखवत चालकास पकडले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.