शिरपूर: मांडळ शिवारातील अनाथ मतीमंद बालगृहातील 19 वर्षीय युवकाचा मृत्यू;शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Nov 22, 2025 शहरातील मांडळ शिवारातील अनाथ मतीमंद मुला–मुलींच्या बालगृहात दाखल असलेल्या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन एन. के. वय 19 असे मयत युवकाचे नाव आहे.17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हिरे मेडिकल हॉस्पिटलच्या डॉ.फुलजालके गौरी यांनी तपासून पवन यास मृत घोषित केले.हॉस्पिटलचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली