सातारा: विदेशी दारूची चोरटी विक्री करणारे पकडले, सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
Satara, Satara | Nov 8, 2025 सातारा तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचा पाडाव करत विदेशी दारूची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत कोल्हापूर-पुणे सर्व्हिस रोडवर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.