देऊळगाव राजा: श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी पायी दिंडी शेगाव कडे रवाना
देऊळगाव राजा दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी परिसर येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पायी दिंडी शेगाव कडे रवाना झाली .पाच दिवस हा पायी दिंडी सोहळा चालणार असून चार ठिकाणी मुक्काम करणार आहे .श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ कुंभारी परिसर देऊळगाव राजा यांच्या वतीने दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात येते .