लातूर: धक्कादायक! लातूरच्या पाचपीर नगरात नवऱ्यावर तलवारीने हल्ला; डोक्यावर प्राणघातक वार, पायाचे मोडलं हाड
Latur, Latur | Dec 1, 2025 लातूर -सारोळा ग्रामपंचायत हद्दीतील पाचपीर नगर येथे (30 नोव्हेंबर) दुपारी सुमारास 2 वाजता एक धक्कादायक घटना घडली. आपल्या पत्नीसंबंधी अपशब्द का बोलले, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुरज पठाण या युवकावर तलवार व धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला.