रामटेक: अप्पर तहसील कार्यालय देवलापार परिसरात माकडांचा हौदोस ; अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेतकरी, ग्रामस्थांमध्ये दहशत
Ramtek, Nagpur | Nov 28, 2025 रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल देवलापार येथील अप्पर तहसील कार्यालय परिसरात मागील काही दिवसांपासून हल्लेखोर माकडांनी हौदोस घातला असून सकाळपासून रात्रीपर्यंत ही माकडे अधिकारी, कर्मचारी तसेच येथे कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता चे दरम्यान लोधापूर - सीतापुर येथील जागरूक नागरिक उमेश फुलबेल हे या परिसरात आले असता माकडांच्या त्रासाची माहिती त्यांनी दिली.