सातारा: पळसावडे (ता. माण) येथे टाटा पॉवर कंपनीविरोधात ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर घोंगडी आंदोलन
Satara, Satara | Nov 10, 2025 माण तालुक्यातील पळसावडे (जि. सातारा) येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीच्या खोट्या आश्वासनांविरोधात आणि स्थानिक कामगारांच्या न्यायहक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “घोंगडी आंदोलन” करण्यात आले.या आंदोलनामध्ये स्थानिक कामगार कुटुंबासह सहभागी झाले असून, कंपनीकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला.स्थानिकांचा आरोप आहे की, कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून रोजगार, मजुरी, स्थानिकांना प्राधान्य, करारनियमांचे पालन, आदी आश्वासन पूर्ण केले नाही.