मंगरूळपीर: भाजपाचा 'रास्ता रोको' इशारा!
प्रवाशांचा गैरसोयीवर.
(आसेगांव सर्कल)
आज २९ नॉव्हेंबर २०२५ शनिवार रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा खुर्द व परिसरातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना होत असलेल्या प्रचंड गैरसोयीविरोधात आसेगाव सर्कल भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (अकोला विभाग) यांना २० नोव्हेंबर रोजी निवेदन देत बसफेऱ्या तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, मागण्या न मानल्यास ८ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे..