सेलू: मोहगाव शिवारात गावठी दारू निर्मितीवर छापा; ३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एलसीबी पथकाची कारवाई
Seloo, Wardha | Nov 30, 2025 स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी अवैध दारू निर्मितीवर केलेल्या कारवाईत सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव शिवार येथे छापा टाकून तब्बल ३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात गजानन उर्फ गब्बर महादेव गव्हाळे (वय ४२, रा. खापरी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २९ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मौजा मोहगाव शिवारातील लामण नाल्याजवळ करण्यात आली. याप्रकरणी रात्री ७ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.