सातारा: प्रतापसिंह हायस्कूल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन उत्साहात
Satara, Satara | Nov 7, 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समता सैनिक दलाच्या वतीने बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी मलिकार्जून माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी राहूल गावडे आदी उपस्थित होते.