कुही: परसोडी रिठी शिवारात वाघाने केली गोऱ्याची शिकार
Kuhi, Nagpur | Nov 20, 2025 ग्रामीण भागात असलेल्या परसोडी रिठी शिवारात शेतात बांधलेल्या गोऱ्यावर वाघाने हल्ला करून शिकार केल्याची घटना घडली .याबाबतचे वृत्त असे की शेतकरी माणिक खराबे यांनी नेहमी प्रमाणे जनावरे शेतावर बांधून घराकडे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच्या सुमारास शेतकरी खरबे शेतावर गेले असता गोऱ्याची शिकार झाल्याचे दिसून आले .त्यावरून घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली त्यावरून घटनास्थळी भेट पाहणी केली. नुकसान ग्रस्त शेतकरी यास भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.