जालना: जालना जिल्ह्यात पावसाचा कहर; जिवीत हाणी सह वित्तहाणीही मोठ्या प्रमाणत; अनेकांना सुरक्षीतस्थळी हलविले
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना जिल्ह्यात पावसाचा कहर पहायला मिळाला असून या पावसामुळे जिवीत हानी सह वित्त हाणी देखील मोठ्या प्रमाणात झाली. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी देखील वाडी वस्त्यावर भेट देत असून त्यांनी नुकसानग्रस्त नागरीकांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाकडून मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली होती.