सातारा: महाविकास आघाडीचा एकत्रित लढणार : सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्याची रणनीती
Satara, Satara | Nov 6, 2025 सातारा जिल्ह्यातील सर्व ९ नगरपालिका आणि एक नगरपंचायतीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार उपस्थित होते.