आज ६ डिसेंबर हा दिवस केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन नसून महामानवाच्या विचारज्योतीचा पुनर्जन्मदिन आहे. हा दिवस मानवी स्वाभिमानाची, लोकशाही संस्कृतीची आणि सामाजिक परिवर्तनाची आठवण करून देणारा दिवस आहे. तो एका महामानवाच्या देहपरित्यागाचा भावनिक व दुःखद क्षण असला, तरी त्याच क्षणी त्याच्या विचारांचा जन्म होऊन परिवर्तन क्रांतीची अक्षय ज्योत प्रज्वलित झाली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींचा दिवस नसून, न्याय, समता,