मुळशी: गडदावणे येथे आढळला तब्बल १२ फुटी अजगर
Mulshi, Pune | Nov 8, 2025 मुळशी तालुक्यातील गडदावणे गावातील ज्ञानेश्वर ओंबासे या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी करताना एक बारा फूट लांबीचा अजगर अढळला.हा अजगर भाताच्या कडपाखाली दडून बसला होता. सर्पमित्र प्रसाद केमसे, निलेश सुतार, अक्षय बलकवडे, गणेश सुतार, स्वराज सुतार, जय सुतार यांनी शर्तीचे प्रयत्नकरून अजगराला पकडले व वन विभागाकडे सुपूर्त केले. याचे वजन तब्बल १६.६किलो होते.