हवेली: लोणी काळभोरमध्ये शेताच्या वादातून कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
Haveli, Pune | Nov 11, 2025 शेताच्या व ड्रेनेज लाईनच्या वादातून एका कुटुंबाला तिघांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राममळा परिसरात रविवारी (ता.9) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.