लातूर: बीएसएनएल ऑप्टिकल फायबर बदलताना शुल्कावरील गूढ वसुली; ग्राहक संतप्त, मनोज सूर्यवंशींचे अधिकाऱ्यांकडे तगादा
Latur, Latur | Nov 29, 2025 लातूर -बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेत एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कॉपर वायरवर चालणाऱ्या जुनी ब्रॉडबँड सेवा ऑप्टिकल फायबरमध्ये रूपांतरित करताना ग्राहकांकडून कोणतीही स्पष्ट माहिती न देता अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.मनोज सूर्यवंशी या ग्राहकाने बीएसएनएलच्या गांधी चौक कार्यालयात लेखी निवेदन दिले असून त्यांनी माहिती अधिकारांतर्गतही या शुल्काविषयी स्पष्ट माहिती मागितली.