राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसाठी तसेच भिसी नगरपंचायतीसाठी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून मतमोजणी पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर 2025 पासून या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे.