गोंदिया: काका चौक, गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न , खासदार प्रफुल पटेल यांची उपस्थिती
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काका चौक, गोंदिया प्रभाग क्र.१२ येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती माधुरी नासरे, प्रभागाचे उमेदवार श्री उमेंद्र भेलावे व श्रीमती कुंदाताई दोनोडे यांच्या चुनाव प्रचारार्थ खासदार श्री प्रफुल पटेल यांनी जनसभेला संबोधित केले. शहरातील स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा, शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक शौचालय, शहरातील वाहतूक व्यवस्थापन, मूलभूत सुविधा, आरोग्य, पायाभूत सविधा राबविण्याचा निर्धार असल्याचे खासदार पटेलांनी म्हटले.