शहरात बोगस आधार कार्ड बनवून मतदान प्रक्रिया राबवण्याची तयारी,भाजपा युवा नेते डॉ क्षीरसागर यांची पोलीस अधीक्षकांना तक्रार
शहरात बोगस आधार कार्ड तयार करून त्यांचे फोटो वापरून मतदान प्रक्रिया राबवणार असल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे भाजपा युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे असे प्रकार अत्यंत गंभीर असून, यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. या वेळी डॉ. क्षीरसागर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.