नाशिक: नाशिकरोड परिसरात गोवंश मांस वाहतूक प्रकरणात पोलिसांची कारवाई
Nashik, Nashik | Dec 1, 2025 नाशिकरोड पोलिसांनी सिन्नर फाटा परिसरात गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले अंदाजे 300 किलो मांस बेकायदा वाहतूक करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन कार व सुमारे 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 30 नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली. आरोपींवर महाराष्ट्र पशू संरक्षण नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहवा मोरे करत आहेत.