दारव्हा: अंतरगाव येथे कच्च्या पुलामुळे शेतजमीन गेली खरडून ,उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
वर्धा–नांदेड रेल्वेमार्गासाठी अंतरगाव येथे करण्यात आलेल्या कच्च्या पुलामुळे डोंगरी नदीचे पाणी अडवले जाऊन शेतकऱ्यांच्या शेत बांध फोडले गेले. त्यामुळे शेतजमीन, पिके व खत वाहून जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आज दि. १६ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान उपविभागीय अधिकारी दारव्हा यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.