वेकोलीच्या वणी क्षेत्रातर्फे घुग्घुस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर वेकोलीच्या अंतरक्षेत्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे ऊद्घाटन वणी क्षेत्राचे महाप्रबंधक सुजीतकुमार पिशोरेड्डी यांच्या हस्ते पार पडले.यावेळी वेकोलीचे अधिकारी तथा कामगार नेते उपस्थित होते. सदर स्पर्धेत वेकोलीच्या अकरा संघांनी सहभाग घेतला आहे.सदर स्पर्धा २९ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. ऊद्घाटनीय सामण्यात वणी क्षेत्राने माजरी संघाचा पराभव करुन विजय मिळवला.