लातूर: राष्ट्रपतींच्या हस्ते वैष्णवी स्वामीला सुवर्णपदक! लातूरची कन्या देशाचा अभिमान ठरली... आनंदाच्या अश्रूंसह साजरा झाला गौरव
Latur, Latur | Dec 1, 2025 लातूर -लातूरची धाडसी मुलगी कु. वैष्णवी विजयकुमार स्वामीने आपल्या अपार चिकाटीने आणि रात्रंदिवसाच्या कष्टाने केवळ स्वप्नच नाही, तर संपूर्ण देशाच्या हृदयात स्थान मिळवले आहे. नवी दिल्लीतील फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (FDDI) च्या पदवीदान समारंभात भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. असल्याची माहिती आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान देण्यात आली आहे.