मोर्शी: कोदोरी शेत शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील, तुर व कपाशीचे पीक नेले कापून, चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक पाच नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार,थुगाव पिंपरी येथील शेतकरी गजानन गुडधे यांच्या कोदोरी शेत शिवारात असलेल्या शेतातील तुर व कपाशीचे पीक कुण्या तरी अज्ञात व्यक्तीने कापून नेल्याची तक्रार गजानन गुडधे यांनी दिनांक 4 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ईसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे