महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये एक महत्त्वाचा निर्णय पुढे आला आहे. शिवसेनेने भाजपाचे पदाधिकारी किंवा नेते घेणार नाहीत आणि भाजपाने शिवसेनेचे, असा परस्पर विनिमयबंदीचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. यामुळे दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या हालचालींवर आता काही प्रमाणात विराम लागण्याची चिन्हे दिसत आहेत.