औंढा नागनाथ: पाटील कॉम्प्लेक्स येथे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिव मल्टीस्पेशालिटी दातांच्या दवाखान्याचा फीत कापून शुभारंभ
औंढा नागनाथ शहरातील पाटील कॉम्प्लेक्स येथे शिव मल्टीस्पेशालिटी दातांच्या दवाखान्याचा हिंगोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दिनांक नऊ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान फीत कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, माजी सभापती अनिल देशमुख,तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, नगराध्यक्ष कपिल खंदारे,उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, अनिल देव,गुड्डू बांगर,डॉक्टर महेश दराडे,सह मान्यवरांची उपस्थिती होती