अलिबाग: माजी नगरसेवक अमर वार्डे व सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या तक्रारीनंतर वन विभागाने अलिबाग नगरपालिकेला कांदळवनावर कचरा टाकण्यास रोखले.
Alibag, Raigad | Nov 11, 2025 अलिबाग नगरपरिषदेविरुद्ध कांदळवनाचा नाश करण्यास मदत केली म्हणून कायदेशिर कारवाई करावी अशी विनंती अलिबाग शहरातील एक जेष्ठ नागरिक तथा माजी नगरसेवक अमर वार्डे व सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दक्षिण कोकण कांदळवन विभागा वन अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार वन विभागाने या जागेत कचरा टाकण्यास मनाई केली. कचरा टाकण्याच्या भूमीमधील काही भाग कांदळवनामध्ये येत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. त्यामुळे या भूमीत कचरा टाकण्यास वन विभागाने मनाई केली आहे. वन विभागाचे कर्मचारी सोमवारी या जागेत आले. तेथील पाहणी करून हद्द कायम करण्याचे काम त्यांनी केले. कांदळवन विभागीय वन अधिकारी यांच्याकडून ही कारवाई सुरू केली आहे. यानंतर वनविभागाच्या आदेशानुसार वनविभागाच्या जागेवरील कचरा हटवण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.